सेलुत मुलीने केली आत्महत्या*

*सेलुत मुलीने केली आत्महत्या*

 मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.

सेलू शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचा शाळेत येता जाता सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या युवकाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना दि. 17 एप्रिल रोजी 01.30 ते 01.45 वेळेत देऊळगावगात येथे घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,
सेलू पोलिस ठाण्यात फिर्यादी वय 42 वर्ष ह.मु. पाथरी रोड तहसील कार्नर सेलू यांनी आरोपी कैलास विजय लोंढे रा. अर्जुन नगर, सेलू येथील व एका अनोळखी इसमावर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हे र. नं. 204/2026 कलम 108, 352, 351(2)(3), 3(5), 78 BNS 2023, 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार पीडित मुलीस मागील तीन महिन्यापासून शाळा सुटण्याच्या वेळेस जाता येता त्रास देत असल्याने फिर्यादीचे मुलीस मानसिक त्रास दिला. माझ्या मुलाला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या भीतीमुळे व नेहमीच्या त्रासाला कंटाळून घरी गफळास घेऊन आत्महत्या केली आहे.
सेलू पोलिस निरीक्षक दीपक बोरेसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी श्रीमती पांगळे यांचेकडे दिला आहे.
या प्रकरणी माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे साहेब, सेलू पोलिस निरीक्षक बोरेसे साहेब, म.स.पो.नि. पांगळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली.
Previous Post Next Post