जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासनात मोठा बदल; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली, श्रीकांत ढिवरे नवे एसपी
शुभम बारी (मीडीया पोलिस टाईम प्रतिनिधी )
राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आता सीआयडी, पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
डॉ. रेड्डी यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठा बदल झाला आहे.
डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे त्यांची कारकीर्द विशेष ठरली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळण्यात आली आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले एसपी श्रीकांत ढिवरे हे अनुभवी आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

