*वर्धा जिल्हयातून प्रथम *
*🌟 कौतुकास्पद! घरची परिस्थिती बेताची असतानाही मिसबाह फातिमाने मारली बाजी वर्धा जिल्हयातून प्रथम!*🌟
*आष्टी* (शहीद): जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यश मिळवता येते, हे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी *कु. मिसबाह नियाजी फातिमा* हिने सिद्ध करून दाखवले आहे.
विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या मिसबाहने बारावीच्या परीक्षेत *९५.६७* % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे तिने *जीवशास्त्र* (Biology) विषयात *१००* पैकी *१००* गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या यशामुळे ती वर्धा जिल्हयातून प्रथम आली आहे.
मिसबाहची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिने कोणत्याही विषयाची खाजगी शिकवणी (Tution) लावली नव्हती. महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या मेहनतीवर तिने हे शिखर गाठले आहे. तिच्या या यशात तिचे आई-वडील आणि महाविद्यालयातील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य *श्री.पी.जी.नागतोडे सर* , उपमुख्याध्यापिका *सौ. विणा तांबसकर* मॅडम, पर्यवेक्षक *श्री. सुनील ईखार* , सागर सव्वालाखे सर आणि सर्व शिक्षक वृंदाने तिच्या घरी जाऊन तिचा व तिच्या पालकांचा गौरव केला.
तिच्या या यशाबद्दल हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष *मा.श्री. राहुलभाऊ ठाकरे* , सचिव मा. *श्री.विनायकरावजी होले,* उपाध्यक्ष *डॉ किशोर भाऊ गंजीवाले* ,सहसचिव *मा.श्री. भरतभाऊ वणझरा* ,कोषाध्यक्ष *मा.श्री.शंकररावजी नागपुरे* , सदस्य *मा.श्री.राजाभाऊ सव्वालाखे* व *मा.श्री.अर्पितजी मालपे* यांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

