*NMMS शिष्यवृत्ती धारक राम सांगडे याचा गुणगौरव;*
*( रोख बक्षीस देऊन सन्मान)*
{ मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण }
————————————
मानवत तालूक्यातील
येथील रूढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी राम अशोक सांगडे याने एन.एम. एम.एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाची दखल घेत त्याला विविध मान्यवरांकडून रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
राम सांगडे याच्या या यशा बद्दल श्री एकनाथ रापेल्लीवार सर यांच्या वतीने ₹१००१ आणि श्रीमती किरण तापडिया मॅडम यांच्या वतीने ₹ ५०० चे प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्याच्या या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी राम सांगडे याचे अभिनंदन केले. व यावेळी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, इतर विद्यार्थ्यांनीही याचा आदर्श घ्यावा,
असे आवाहन यावेळी करण्यात आले.

