फैजपूर शहरात 'जागतिक कामगार दिन'महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा; कामगारांच्या योगदानाचे केले गौरव
फैजपूर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी
येथील श्रमिक कोहिनूर कामगार संघटना आणि जनविकास सोसायटी नाशिक विभाग फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे 'महाराष्ट्र दिन' आणि 'जागतिक कामगार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार दिनाचा इतिहास:
कार्यक्रमादरम्यान कामगार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद करण्यात आले. १ मे १८८६ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि कामाचे तास निश्चित करण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात हुतात्मा झालेल्या कामगारांच्या स्मृतीप्रित्यर्थ १८८९ पासून दरवर्षी १ मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातही १ मे १९२३ रोजी मद्रास (चेन्नई) येथे पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला होता.
मान्यवरांची उपस्थिती:
या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीत कामगारांचे योगदान अमूल्य आहे. कामगारांच्या मेहनतीमुळेच देश प्रगतीपथावर आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शाकीर मलिक मार्गदर्शन करताना सांगितले की कामगार या महेनती मुळे व कामगारा शिवाय देशाची प्रगती शक्य नाही देशाच्या राज्याच्या गावाच्या विकासामध्ये कामगारांचे घामाचा मोठा वाटा आहे तरी कामगारांचा सन्मान व सत्कार होणे गरजेचे आहे कामगार संघटना तर्फे येत्या पंधरा दिवसाचे आत एक कार्यक्रम घेणार त्यामध्ये कामगारांना केलेले कामगिरीचे गौरव करण्यात येणार आहे तरी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील बांधकाम व विविध क्षेत्रात काम करणारे कॉन्टॅक्टर ठेकेदार राज मिस्त्री कामगार रावेर यावल भुसावल भागातील कामगार कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांना आपले क्षेत्रात केलेली कामगिरीचे संस्थाची संपर्क करून त्यांना सन्मान व सत्कार देण्यासाठी आमच्या संस्थेची मानस आहे तरी संपर्क साधावा असे सांगितले व या वेळी कामगार संघटनाचे पदाधिकारी, तसेच यावल तालुका अध्यक्ष नगरसेवक पवन अनिल सराफ युनूस बाबुलाल पिंजारी शेख नईम मिस्तरी, शेख इरफान, लुकमान मिस्तरी, युनुस पिंजारी, हाजी गयास पिंजारी, शेख शाकीर, करीम नथु तडवी, युनुस बाबा, आसिफ मिस्तरी, असलम भांनजा ,मिस्तरी इब्राहिम कालू तडवी, हमीद शाह, रऊफ रफीक ठेकेदार. मोमीन न्हावी सय्यद कबीर रफिक शाह बामनोद वाले अ कादिर भाई आसिफ कमरोद्दीन ठेकेदार अभियंता सोहिल मलिक यांच्यासह अनेक मान्यवर आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

