*
दर्गा रोड प्रभाग ११ साठी ६ डीपी, ५० पोल व ओपन जिमला आमदार राहुल पाटील यांच्याकडून मंजुरी
[]नगरसेवक अबरार इलाही राज यांच्या पाठपुराव्याला यश []
{ मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण }
———————————
दर्गा रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विविध विकास कामां साठी नगरसेवक तथा शिक्षण सभापती सय्यद अबरार इलाही राज यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
शिवसेनेचे कार्यसम्राट, विकास पूरूष आमदार राहुल पाटील यांच्याकडे मागणी करून या प्रभागा करीता ६ रोहित्र डी.पी, ५० विद्युत पोल तसेच डॉ. हाश्मी यांच्या निवासस्थाना ( घरा ) समोर ओपन जिम उभारण्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
या कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेचे कार्यसम्राट, विकास पूरूष आमदार आ. श्री. राहुल पाटील यांनी दिले. यावेळी त्यांनी सन्माननिय नगर सेवक सय्यद अबरार इलाही राज यांचा यशोचित सत्कार करून त्यांच्या सामाजीक कार्याची दखल घेतली.
यावेळी सन्माननिय नगर सेवक मुश्शु खान, मा. अब्दुल राज, मा. अकबर जहागीरदार, मा. नय्युम बॉड, मा. जहीर भाई आदीसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रभागातील नागरिक , युवकांकडून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

