फळांचा राजा ‘आंबा’ मानवत , पाथरी शहरात दाखल; केशर, दशेरी, लालबाग आंब्यांची मागणी वाढली.
{ मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण }
————————————
उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आता पाथरी व मानवत शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे.
यामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
यावर्षी विशेषतः केशर, दशेरी आणि लालबाग या लोकप्रिय आंब्यांच्या जातींची आवक मानवत व्यापार पेठेत वाढली आहे. गोड चव, सुगंध आणि आकर्षक रंगामुळे ग्राहकांकडून या आंब्यांना मोठी पसंती व मागणी होत आहे.
स्थानिक बाजारात तसेच फळ विक्रेत्यांकडे विविध दर्जाचे आंबे उपलब्ध होत असून दर ही हळूहळू स्थिरावत आहेत.
फळ विक्रेत्यांच्या मते, सुरुवातीला आंब्याचे दर जास्त होते, मात्र आवक वाढत असल्याने आता सामान्य ग्राहकांनाही परवडतील अशा दरात मानवत व्यापार पेठेत आंबे मिळू लागले आहेत. विशेषतः केशर आणि दशेरी आंब्यांची मागणी अधिक असल्याचे व्यापार पेठेत दिसून येत आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने आंब्याच्या खरेदीत आणखी वाढ झाली आहे. पाहुणचारासाठी तसेच गिफ्ट म्हणून आंब्याला विशेष महत्त्व दिले जात असल्याने विक्रेत्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एकंदरीत, आंब्याच्या आगमनामुळे पाथरी– मानवत शहरातील बाजारपेठा रंगतदार बनल्या असून नागरिकांना उन्हाळ्या तील या गोड फळाचा आस्वाद घेण्याची संधी व्यापारी बांधवांनी उपलब्ध करून दिली आहे.
***

