पी.एम. श्री. न.प. माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, (गांधी विद्यालय) आर्वीचा निकाल ९३.७९ टक्के
जेष्ठ पत्रकार अब्दुलकदीर विदर्भ मराठवाडा संपादक
आर्वी (प्रतिनिधी): स्थानिक नगर पालिका आर्वी द्वारा संचालित पी.एम. श्री. न.प. माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी या विद्यालयाचा इयत्ता १२ वी चा (H.S.C. बोर्ड, नागपूर) निकाल 93.79 % लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत महाविद्यालयातील एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी:
• प्रथम क्रमांक: कु. अनुष्का प्रकाश माखीजा (८०.५०% गुण)
• द्वितीय क्रमांक: कु. अनम कौसर मो. इम्तियाज अन्सारी (७२.१७% गुण)
• तृतीय क्रमांक: कु. आयेशा फारुख नागोरी (६९.६७% गुण)
या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल नगराध्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाने, उपाध्यक्ष श्री. गौरवभाऊ जाजू, मुख्याधिकारी डॉ. किरणजी सुकलवाड, प्राचार्य श्री. विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षिका कु. ज्योती अजमिरे, प्रा. नितीन बोडखे, प्रा. विजय शेंडे, प्रा. प्रशांत जळीत व इतर सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षिका तसेच माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

