बहुजन समाज पार्टी भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत

बहुजन समाज पार्टी भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत 


महेश निमसटकर 
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 



भद्रावती, दि.१७ : बहुजन समाज पार्टी कार्यालय भद्रावती, येथे दि. १६ मे रोज शनिवारला बहुजन समाज पार्टी ची भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली. ही कार्यकारीणी अधिवक्ता भूपेंद्र रायपूरे, मिलिंद शेंडे, विधानसभा प्रभारी, विकास दुर्योधन, विधानसभा प्रभारी, हरिऔंध भारती, विधानसभा अध्यक्ष, अजय लिहीतकर, बसपा नेता आणि मंगेश सोनुलकर, बसपा नगर सेवक तथा बांधकाम सभापती तसेच शहर अध्यक्ष भद्रावती यांचा मार्गदर्शनाखाली शहर कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.
     बहुजन पार्टी भद्रावती शहर च्या नवीन कार्यकारीणीत अजिंक्य बुरनुले, शहर उपाध्यक्ष भद्रावती, सचिन चालखुरे, शहर उपाध्यक्ष, शब्बू ताई रामटेके, शहर महासचिव, अमूर्त भालेराव, शहर सचिव, कुलदीप लोणारे, शहर सचिव, संतोष सिडामे, शहर सचिव, प्रतिमा खोब्रागडे, शहर सचिव, राजेंद्र पाटील, शहर प्रभारी भद्रावती, नरेंद्र रंगारी साहेब, शहर प्रभारी भद्रावती यांची नियुक्ती करण्यात आली.
     यावेळी संदीप वालदे, माणिक भालेराव, प्रीता रायपूरे, अशोक जवादे, अवध प्रसाद, सुधीर भारती, नामदेव रामटेके, रवींद्र वानखेडे, मुनेश्वर गौरकार, विशाल कांबळे व इतर पदाधिकारी उपस्तित होते.
Previous Post Next Post