---
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीचा आढावा; पोलिस अधीक्षक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक*
*
वर्धा प्रतिनिधी- जेष्ठ पत्रकार अब्दुल कदीर
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पारदर्शकता व जबाबदारीची जाणीव अधोरेखित करण्यात आली. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात शांतता, सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात शांतता, सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आले.

