पीएम श्री नगरपरिषद गांधी विद्यालयाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला*स्टुडंट पोलीस कॅडेट या योजनेअंतर्गत महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा झाला सन्मान

*पीएम श्री नगरपरिषद गांधी विद्यालयाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला*

स्टुडंट पोलीस कॅडेट या योजनेअंतर्गत महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा झाला सन्मान 

विदर्भ मराठवाडा विभागीय संपादक अब्दुलकदीर 



वर्धा- आर्वी स्थानिक पीएमश्री नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच गांधी विद्यालय यामध्ये एनसीसी छात्र सैनिकांचे संपुर्ण तालुक्यातून एकमेव युनिट आहे तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट हा उपक्रम गेल्या बरेच वर्ष सुरू आहे या अंतर्गत सुद्धा जे विद्यार्थी एनसीसी मध्ये पात्र ठरत नाहीत किंवा त्यांना संधी मिळत नाही त्या सर्वांना स्टुडंट पोलीस कॅडेट मध्ये संधी मिळते आणि ते सुद्धा वर्षभर विविध उपक्रम जे पोलीस स्टेशन आर्वी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा यांच्यातर्फे राबवले जातात त्यामध्ये विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवतात या सर्वांचा गौरव म्हणून एक 1 मे महाराष्ट्र दिन सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा आणि इतर अधिकारी यांच्या शुभहस्ते कुमारी अदिती अंगाईतकर आणि कु. श्रद्धा कळंबे या दोन विद्यार्थिनी सोबत त्यांच्या मार्गदर्शिका शिक्षिका श्रीमती स्मिता बिजवे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे होते या विद्यार्थ्यांचा सर्वत्र कौतुक होते माननीय नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने उपाध्यक्ष गौरव भाऊ जाजू तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक, मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड, प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले पर्यवेक्षिका श्रीमती ज्योती अजमेरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post