मल्हारपेठ सह्याद्री सखी मंच पाटण यांच्या वतिने ठोमसेतील महिलाना स्वंयरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पंचगव्य कार्यशाळा संपन्न झाली

सह्याद्री सखी मंच पाटण यांच्या वतिने ठोमसेतील महिलाना स्वंयरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पंचगव्य कार्यशाळा  संपन्न झाली 

सातारा जिल्हा प्रतिनिधी शशिकांत माथने 

    ठोमसे (ता .पाटण) येथील महिलाना चुल आणी मुल एव्हढ्यावर न थांबता ग्रामिण भागातल्या महिलादेखील स्वतः सक्षम व्हाव्या या उदात्त हेतुने सह्याद्री सखी मंच पाटण यांच्या विद्यमाने विविध व्यवसायाभिमुक पदार्थ स्वत बनवुन त्याचे शहरी भागात विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून महिलाना विविध पाक कला सण उत्सव व विविध गृह उपयोगी वस्तु व सॊंदर्यप्रसाधने व पुजेची नानाविध वस्तु बनविण्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण घेण्यात येत आहे  दि ५ रोजी पंचगव्य कार्यशाळा आयोजित केली होती यात देशी गायीच्या शेण व गोमुत्रापासुन सेंद्रिय शेतीसाठी जिवामृत,धनजिवामृत बोजामृत,निमास्त्र ब्रमास्त्र अग्निअस्त्र दशपर्णी,बुरशिनाषक आणि यासारख्या अनेक गोष्टी बनवण्याची पद्धत व प्रशिक्षण घेणेत आले 
यावेळी रोहिणी पाटील, मालदन च्या सरपंच गीतांजली काळे आणि शोभा कदम 
यांनी मार्गदर्शन केले 
फोटोओळी
ठोमसे :- सह्याद्री संखी मंच पाटणच्या सदस्यांनी येथील मगिलाना कार्यशाळेद्वारे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देताना
Previous Post Next Post