रामतीर्थ येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापन, सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

रामतीर्थ येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापन, सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील रामतीर्थ शंकर नगर येथे तक्षशिला बुद्ध विहारांमध्ये दिनांक 5/5/026 रोजी मोठ्या उत्साहात, विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बौद्ध यांच्या,मूर्तीची स्थापना करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, व कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय रविंद्रजी चव्हाण,व प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,ओबीसी नेते माणिक जी लोहगावे, काँग्रेस बिलोली तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, शिवसेना तालुका अध्यक्ष बाबाराव रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अमोल शेरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका  सदस्य व पत्रकार मारोती एडकेवार, वंचित बहुजन आघाडीचे खतगाव येथील कार्यकर्ते अनिल बुद्धेवार, वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष हिप्पारगा थडी मुज्जू भाई सय्यद,व सर्व बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरी जनता व पत्रकार बंधू व आंबेडकरवादी विचाराचे, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी,मनोगत व्यक्त करताना माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी तथागत गौतम बुद्धांचे विचार हे प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचावे,असे समाजाला प्रबोधन केले, व कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सर्व समाजाला संविधानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचे, योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तक्षशिला,बुद्ध विहार समिती आयोजक अध्यक्ष संदीप कांबळे,उपाध्यक्ष गंगाधर कांबळे,यांनी मोठ्या हिमतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडण्यासाठी, मोठी मेहनत घेतली व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर साहेबांचा,वादळ वारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला.
Previous Post Next Post