भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाही जलसा ~ जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन

भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाही जलसा ~ जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी झाली.
त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नांदेड नगरी मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन वंचीत आघाडी चे दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन व उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे यांनी केले. दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजता मॅरेथॉन चे स्थळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा पासून महात्मा ज्योतिबा फुले पुतळा (आय टी आय कॉर्नर ) पर्यंत ठेवण्यात आला आहे. नंतर स. १० वाजता भव्य शाखा उदघाट्न त्यानंतर शालेय साहित्य वाटप आणि मिठाई वाटपाचे कार्यक्रम तरोडा नाका येथे ठेवण्यात आले. मग त्यानंतर दि.१९ मे २०२६ रोजी नियोजित कार्यक्रम महात्मा बसवेश्वर पुतळा कौठा, नांदेड येथे सायंकाळी ०६ वाजता भव्य असा भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाहिरी जलसा चा कार्यक्रम ठेवण्यात आले असून यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक वंचित बहुजन युवा आघाडी सम्यक विद्यार्थ्या आंदोलन महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणाऱ्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा आपली उपस्थितीच्या निमित्ताने त्यांना देऊयात असे प्रचारण दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर पा.महाजन आणि उत्तर जिल्हाध्यक्ष राज आटकोरे यांनी बोलताने सांगितले. आणि या भव्य कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे सर्व आंबेडकर चालवळीतल्या नागरिकांना आव्हान करण्यात आले.
Previous Post Next Post