विकास विद्यालय गिरड येथे समर कॅम्प ची सांगता.. l

विकास विद्यालय गिरड येथे समर कॅम्प ची सांगता.. l

राजु कांबळे 
मीडीया पोलीस टाईम 
वर्धा नागपूर विभागीय प्रतिनिधी

वर्धा : (5 मे) वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपूर - गिरड येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय द्वारे दिनांक 23 एप्रिल ते 5 मे 13 दिवसीय तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पची सांगता आज झाली. 

या समारोपीय कार्यक्रमाला मान. श्री.मुख्याध्यापक / प्राचार्य व्हि. एम. सोनकुसरे साहेब अध्यक्ष म्हणून लाभले. प्रमुख  अतिथी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदिर मामू (  इंटरनॅशनल ह्युमन राईड महाराष्ट्र उपाध्यक्ष ), जेष्ठ पत्रकार मनवर शेख, नरेश ढोबे ,गौतम शेळके यांची कार्यक्रमाला  उपस्थिती होती. 

या कॅम्प मध्ये शिकविण्यात आलेले उपक्रम सुंदर हस्ताक्षर व देवनागरी लिपी, नृत्य,चित्रकला आर्ट,लेझिम, ज्युडो कराटे, लाठी काठी, कबड्डी, खो खो, व्हॉलिबॉल,लंगडी, धावणे, क्ले वर्क, कोलाज,  वकृत्व, गीत गायन इत्यादी प्रकार चे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना वर्धा येथील महाराष्ट कराटे चीप जज सेन्साई निलेश राऊत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

आज बक्षीस समारोप कार्यक्रमात कॅम्प प्रशिक्षक ज्युडो कराटे व डान्स टीचर काजल डोंगरे, कराटे गोल्ड  मेडलिस्ट संविधान राजु कांबळे,  मंथन भांदक्कर, कृष्णा कामडी,मोहित, मानसी घरत, अनुष्का गुंडे, कृणाली भुजाडे,  समीक्षा बावणे, आकांक्षा बावणे, कृतिका गलांडे, हर्षदा सुरजूसे, नाभिया पटेल यांना ट्रॉफी,गोल्ड मेडल, प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात ह्युमन राईट महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कदिर मामू , शाळेचे प्राचार्य मान श्री विकासजी सोनकुसरे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच कॅम्प ऑर्गनायझर राजु कांबळे , सौ.प्रगती कांबळे यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक उमेश वाणी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक राजू कांबळे यांनी केले. शेवट कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी झाली.
Previous Post Next Post