*वर्धा जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2026-27 उत्साहात संपन्न**

**वर्धा जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2026-27 उत्साहात संपन्न**

हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा 

सुशांतसिंह सर स्केटिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित वर्धा जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2026-27 उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. सुधीरबाबुजी कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. नयनाताई तुळसकर, मा. डॉ. निर्मेश कोठारी, मा. श्री. सुरजसिंह गहेरवार, मा. सौ. चित्राताई गहेरवार, मा. श्री. नितेश नवरखेडे आणि मा. सौ. अचल कटारिया उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील शिस्त, सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या स्पर्धेत एकूण 3 इव्हेंट होते ( 100m , 200m, & 400m) यात एकूण 111 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी 27 खेळाडूंना सुवर्णपदक व सन्मानचिन्ह, 27 खेळाडूंना रौप्यपदक व सन्मानचिन्ह तसेच 27 खेळाडूंना कास्यपदक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याशिवाय सर्व सहभागी खेळाडूंना सहभागी पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे मुख्य आयोजक व प्रशिक्षक श्री. सुशांतसिंह गहेरवार यांच्या अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन आणि खेळाडू घडविण्याच्या समर्पित कार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
या उत्कृष्ट स्पर्धेमध्ये बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनीही कामगिरी करत मदत केली व उपस्थित मान्यवरांकडून तसेच प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक मिळविले व मंचावर विशेष सन्मान प्राप्त केला.
स्पर्धेचे पंच म्हणून श्री. निशांत येखंडे, श्री. सचिन बंगालवर , श्री. आशिष वांढरे, श्री. कबीर महेशगौरी, कु. नम्रता दुबे, कु. रुपाली क्षिरसागर आणि कु. जवेरीया शेख  , सायली जमखुटे,निर्मेश शेंडे , इमरान शेख , श्लोक नवाहते,  अंतरीक्ष पाटील , वैष्णवी डाखोरे , दीपिका लखपती यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी सुशांतसिंह सर स्केटिंग अकॅडमीचे विशेष कौतुक केले. संपूर्ण स्पर्धा खेळाडूंच्या उत्साह, क्रीडाभावना आणि उत्कृष्ट कामगिरीने गाजली. ही स्पर्धा जिल्ह्यातील स्केटिंग खेळाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post