सगरोळी 33 केव्ही येथील महावितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार... महावितरण उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी लक्ष देण्याची गरज ?

सगरोळी 33 केव्ही येथील महावितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार 

 महावितरण उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी लक्ष देण्याची गरज ?

(मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )

नांदेड :बिलोली तालुक्यातील महावितरण सगरोळी 33 केव्ही उपकेंद्र येथील कर्मचाऱ्यांचे मनमानी कारभार चालू असून,याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. दोनच दिवसा खाली,माननीय देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी सर्व महावितरण अधिकाऱ्यांना पावसाळी, अभावी कामे करून घ्या व नागरिकांना अडचणी येणार नाहीत असे,आदेशित केले मात्र 33 केव्ही सगरोळी येथील कर्मचारी आमदार साहेबांच्या आदेशालाच दुर्लक्ष करत आहेत, 33 केव्ही सगरोळी उपकेंद्रातून हिप्परगा थडी येथे वीज पुरवठा केला जातो,आणि हिप्परगा थडी येथे अनेक पोल वरती वेली,व झुडपे वाढल्यामुळे मीटरचा केबल हे तुटून खाली पडत आहेत. याविषयी महावितरण कर्मचारी उपलवार व मामीडवार यांच्याशी संपर्क केले असता,मामीडवार म्हणतात मी कोणालातरी पाठवतो, उपलवार म्हणतात मी कोणालातरी पाठवतो ,अशा प्रकारे नागरिकांचे केबल जोडून देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, तर  अशा कर्मचाऱ्यावरती खरंच वरिष्ठ  अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे,या 33 केव्ही उपकेंद्र सगरोळी येथील कर्मचाऱ्यांवरती, वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे आणि पावसाळ्या अभावी वीज पुरवठा, सुरळीत राहील यासाठी हिप्परगा थडी, येथे पोल वरती वाढलेले वेल,व झुडपे साफ करून ज्या ज्या ग्राहकांचे मीटर केबल, पोल पासून तुटलेले आहेत त्यांचे मीटर केबल बसून देण्यासाठी, प्रयत्न करतील का हा सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे, 33 केव्ही येथील कर्मचारी यांना फोन केले असता, त्यांनी उडवाउढीचे उत्तरे देत आहेत. मनमानी कारभार जर महावितरण अधिकारी करत असतील तर सामान्य,माणूस हे कोणाकडे जावे ही मोठी शंकातीका सगरोळी सर्कलमध्ये नागरिक करत असून,महावितरण कर्मचाऱ्या बद्दल नागरिकात प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, देगलूर बिलोली विधानसभा माननीय  आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी आदेशित करून सुद्धा, जर सामान्य जनतेचे प्रश्न महावितरण कर्मचारी सोडवत नसतील तर त्या पोलवरती सामान्य माणूस चढायचं का, व मीटर केबल बसून घ्यायचं का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असून बिलोली,तालुक्याचे उपविभागीय अभियंता महावितरण अधिकारी यांनी याकडे लक्ष देतील का आणि लक्ष,देऊन सर्व हिप्परगा थडी येतील नागरिकांचे अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी आदेश द्यावे अशी नागरिकांमधून,वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अभियंता बिलोली यांना विनंती करत आहेत.
Previous Post Next Post