हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी..
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
दिनांक 29/06/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. पोलीस निरीक्षक सा. यांचे आदेशाने पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की, एक लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैधरित्या विना परवानगीने काळया रेतीची अवैदयरित्या चोरी करून ट्रॅक्टर मध्ये भरून नांदगांव चौक कडुन कलोडे चौकाकडे वाहतुक करणार आहे, अशी मुखबीरकडून खात्रीषीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार हे खाजगी वाहनाने रवाना होवून कलोडे चौक हिंगणघाट येथे नांकाबदी करीत असताना एक लाल रंगाचा ट्रक्टर येताना दिसल्याने ट्रक्टर चालकांस थाबवून चालकास त्याचे नाव, पत्ता विचारला असता विना ट्रॅक्टर क्रमांकचा चालक याने त्याचे नाव नामे देवदत्त विठठलराव वरखेडे वय 43 वर्श रा.मास्टर कॉलनी हिंगणघाट ता.हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले. ट्रॅक्टर व ट्रॉलीची पंचासमक्ष पाहनी केली असता 1) एक महिंद्रा सरपंच कंपनीचा लाल रंगाचा ट्रक्टर ज्यास आरटीओ नोंदणी क्रमांक नसलेला असून किं. 4,00,000 2) विना क्रमांकाची ट्राली किंमत 1,00,000रू ,3) ट्राँलीमध्ये भरून असलेली एक ब्राँस रेती (100 फुट) गौण खनिज ओली रेती किं. 5,000रू असा जु कि.5,05,000रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीस ताब्यात घेवून पोस्टे ला परत येवून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेव सा., मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. रोहीत साठे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.