पुणे येथील गावठी दारुमुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात अवैध दारुनिर्मिती व विक्रीत्यां विरोधात मोहिम तीव्र करण्यात आली याच पार्श्वभूमीवर.

पुणे येथील गावठी दारुमुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात अवैध दारु
निर्मिती व विक्रीत्यां विरोधात मोहिम तीव्र करण्यात आली
 याच पार्श्वभूमीवर.       

यावल जळगाव विभागीय प्रतिनिधी मुबारक तडवी 

जळगाव
जिल्हयात दि. 01/06/2026 ते दि. 07/06/2026 या कालावधीत देवुळवाडे, शेळगाव,
सिरसोली व भोलाने ता. जळगाव तसेच भालशिवपिंपरी, दहिगांव, किनगांव, सावखेडा ता.
यावल व ता. जळगांव जिल्हा जळगांव या परीसरातील तापी नदी काठी अवैद्य हातभट्टी दारु
निमिर्ती केंद्र, विक्री केंद्र व वहातुक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याकरिता मा. अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्री. व्हि. टी. भुकन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार
करण्यात आले. या कालावधीत एकुण २५ गुन्हे नोंदकरणयात येवुन १५ आरोपीं ताबयात
घेण्यात आले आहे. त्यांच्या ताबयातुन १२१४० लीटर रसायन व ४८७ लीटर गावठी दारु
जपत करण्यात आला आहे त्याची एकुण किंमत १६,५५,८३५/-इतकी आहे. सदर मोहीमेत
मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, श्री. व्ही.टी. भुकन स्वतः व निरीक्षक जळगाव श्री. अ.
कै. सु. मोमीन (अतिरिक्त कार्यभार) निरीक्षक भरारी पथक जळगाव श्री. अशोक तारु
दुय्यम निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सर्वश्री. किरण वराडे, दिनकर पाटील, योगेश सुर्यवंशी,
सहाय्यक दुय्यम निरीक्षक सर्वश्री. बाविस्कर व नरेंद्र पाटील जवान वर्ग सर्वश्री अमोल
पाटील, धनसिंग पावरा, प्रकाश तायडे, रविंद्र जंजाळे, नंदु पवार, विठ्ठल हटकर, राहूल
सोनावणे, गोकुळ सुर्यवंशी जवान-नि-वाहनचालक गोकुळ अहिरे, महिला जवान पुनम
पाटील यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईत जवान श्री. अमोल पाटील, नंदु पवार, विठ्ठल
हटकर व सहा. दु.नि. बावीस्कर यांनी तापी नदीत पोहून नदीत सोडलेले रसायनच्या साठा
नाश करण्याची कामगिरी केली. यापुढे अवैध दारु निर्मीती, विक्री व वाहतुकीवर कारवाई
आणखी तीव्र स्वरुपाची होणार आहे तसेच सराईत गुन्हेगरावंर मुंबई दारुबंदी कायदा 1949
चे कलम 93 ची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे. सर्व गांवातील पोलीस पाटील व
सरपंच यांना सुचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या गांवात हातभट्टी पुर्णपणे बंद
करण्याकरिता विभागास सहकार्य करावे त्याकरिता ग्राम रक्षक दल स्थापन करावे.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध मध, हातभट्टी निर्मीती, वाहतुक व
विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३९९९९
व वॅट्स अॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधण्यात यावे असे अहवान करण्यात
आले आहे.
निरीक्षक
राज्य उत्पाद
• जळगाव
शुल
200/08/2025
अ.के.सु.मोमीन
प्रभारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
जळगांव
Previous Post Next Post