आर.पी.आय. (आठवले गट)च्या जिल्हाध्यक्षपदी शहाद्याचे अनिल कुवर तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची निवड..

आर.पी.आय. (आठवले गट)च्या जिल्हाध्यक्षपदी शहाद्याचे अनिल कुवर तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची निवड..

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

शहादा :  नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा कार्यकारणीची बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आले.

 नंदुरबार विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नूतन जिल्हाध्यक्ष पदी अनिल कुवर यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे 

नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा कार्यकारणीची बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रमेश माकासरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. नंदुरबार विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वाल्मीक दामोदर, कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव, महासचिव राजू शिरसाठ, भरत जाधव, डॉ. भूषण पाटील, खान्देश विभाग प्रमुख लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, धुळे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष कैलास आखाडे, शहादा तालुका अध्यक्ष प्रकाश सामुद्रे, अध्यक्ष भिकालाल ढोढरे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष बापू महिरे, शहादा येथील नरेंद्र कुवर, संतोष कुवर, बापू घोडराज, प्रा. चंद्रविलास बिराडे, साहेबराव बिरारी, प्रकाश बुलाले, राजू बिरारी, सुशील बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बैठकीला मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रमुख प्रकाश मकासारे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्याची कार्यकारणी ही रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शन नुसार घेण्यात आले असून त्यांच्या आदेशानुसार ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची तर नंदुरबार जिल्हा प्रतोत भीमराव अहिरे व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अशोक शिरसाठ यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी बापू ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नूतन अध्यक्षांनी पक्षाचे ध्येय धोरण राबवून करून पक्ष वाढीसाठी काम करावे. पक्ष मजबूत होईल व तळागाळातील लोकांना न्याय मिळेल असे काम करावे यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नूतन जिल्हाध्यक्ष अनिल कुवर म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात दलित आदिवासी संघटना मध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून या कामाची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले व राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे व रामभाऊ माणिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यात येणार असून पक्ष वाढीसाठी नेहमी तत्पर राहणार.
Previous Post Next Post