भद्रावती येथे वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरी..सुवासिनींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली

भद्रावती येथे वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरी

सुवासिनींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली

 (महेश निमसटकर 
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)

 भद्रावती :-   आज दिनांक 29 तारीख ला शिवनगर सूर्य मंदिर वार्ड भद्रावती येथे  सुवासिनींकडून वटवृक्षाचे पूजन करून वटपौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, या प्रेरणेने गावातील सुवासिनींनी सकाळपासूनच वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती.महिलांनी पारंपरिक पेहराव करून वटवृक्षाला हळद-कुंकू, फळे आणि फुले अर्पण केली. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून महिलांनी मनोभावे प्रदक्षिणा घातल्या आणि सात जन्माच्या सोबतीसाठी प्रार्थना केली. यंदा महिलांनी वडाच्या फांद्या तोडण्याऐवजी थेट जिवंत वटवृक्षाची पूजा करून पर्यावरणपूरक सण साजरा केला. एकमेकींची ओटी भरून सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post