सायंकाळी आम्रेश्वर मंदीरात बैठकीचे आयोजन*
———————————
मानवत प्रतिनिधी / अनिल चव्हाण.
मानवत येथे नगर सेवक दत्तप्रसाद बांगड यांच्या मार्गदर्शनाखाले विविध विषयावर महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या महत्व पूर्ण बैठकीमध्ये तालूक्यासह शहरातील विविध प्रश्नावर विचारमंथन होणार असून या महत्वपूर्ण बैठकीला शहरातील सूज्ञ नागरिकांनी उपस्थित राहून आपले अमूल्य मत मांडावे असे आवाहन बांगड यांनी केले.
*मानवत वासियांनों अभि नयी तो कभी नही.* या श्लोगनाखाले सर्वांना विचार विनमय करण्यासाठी महत्वाच्या बैठकीचे आयोजन नगर सेवक तथा प्रतिष्ठित व्यापारी दत्तप्रसादजी बांगड यांच्या प्रमूख उपस्थिती खाले करण्यात आली आहे.
मानवत शहर, तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, व व्यापारी संघटनाच्या, तसेच पत्रकार संघाच्या अध्यक्ष यांना व शहरातील विकासप्रिय मानवतकर वासीयांना कळकळीचे नम्र आवाहन करण्यात आले असून आज दिनांक १ जून सोमवार रोजी दत्तप्रसाद बांगड यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाले रात्री 8 वाजता आम्रेश्वर मंदीराच्या सभामंडपाच्या सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये खालील विषयावर महत्वपूर्ण चर्चा करून विचार मंथन करण्यात येणार असून या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे कळकळीचे आवाहन करण्यात आले.
*महत्वपूर्ण बैठकीतील विषय*
*1 )* मानवत शहरातील महाराणा प्रतापसिंहजी चौक ते मानवतरोड रेल्वे स्टेशन उड्डान पूल दरम्यान चार ते पाच ठिकाणी गतिरोधक बसविणे बाबत.
*2)* कापसाच्या हंगामात राष्ट्रीय महामार्ग ६१ वर असलेल्या कापसाच्या जिनिंग प्रेसिंग समोर पार्किंग सूविधा उपलब्ध नसल्यामुळे कापसाची शेकडो वाहने उभी राहत असल्याने महामार्ग हा अपुरा पडत आहे. महाराणा प्रतापसिंहजी चौक ते उड्डान पूल रेल्वे स्टेशन पर्यंत महामार्ग चौपदरीकरण करणे बाबत
*3)* परभणी जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या 3 डेपो मध्ये राखीव जागा बुकिंग काउंटर नसल्याने सामान्य नागरिकांना राखीव जागा बुकिंग करण्यासाठी परभणीला जावे लागत आहे. सर्व सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पाथरी जिंतूर व गंगाखेड या तीन्ही आगारांमध्ये राखीव जागा बुकिंग काउंटर सुरू करणे.
*4)* सर्वात महत्त्वाचा प्रश्न मानवत रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस रेल्वे गाडीला थांबा मिळावा, तसेच 2016 मध्ये मानवतरोड ते परळी या रेल्वे मार्गाचा सर्व्हे झालेल्या रेल्वे मार्गाला राज्य सरकारची मंजुरी मिळावी म्हणून बैठकीत चर्चा.
*5)* मानवत शहरातील एकमेव मुख्य मार्गावर तीन ते चार ठिकाणी गतिरोधक बसविणे, मेन रोडच्या मध्यभागातून दूभाजक निर्मिती यावर चर्चा
*6)* महाराणा प्रतापसिंहजी चौक ते पाळोदी, रामेटाकळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम संथ गतीने होत आहे. हे काम त्वरित होण्यासाठी या वर ही विचार मंथन करण्यात येणार आहे.
तसेच या महत्वपूर्ण बैठकीमध्ये ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर ही विचार मंथन करण्यात येणार असून या बैठकीला मानवत शहर व तालुक्यातील राजकीय सामाजिक व व्यापारी संघटनाच्या अध्यक्ष व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठित व्यापारी तथा नगर सेवक दत्तप्रसादजी बांगड, संपादक के. डी. वर्मा यांनी मानवतकरांना केले आहे.

