अंधश्रद्धा निर्मूलन व निर्भीड लेखनाची दखल, कमलाकर जमदडे यांना 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
सिटी इंडिया न्यूजच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये शानदार सोहळा
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी 'सिटी इंडिया न्यूज'च्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त,आयोजित स्नेह मेळाव्यात, सामाजिक बांधिलकी जपत अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती आणि निर्भीड पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार कमलाकर जमदडे यांना "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील 'हॉटेल अँड श्रीपाद' येथे करण्यात आले होते. कमलाकर जमदडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक जनजागृती आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने केलेल्या अभ्यासपूर्ण पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून योगेशजी मिसाळ, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पिंपळवाडकर, सिटी इंडिया न्यूजचे मुख्य संपादक गणेश पांडुरंग चौधरी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अमोलजी पुरी, ज्येष्ठ पत्रकार दिनेशजी दीक्षित, कार्यकारी संपादक संदीप विनायकराव पांचाळ तसेच मुख्य उपसंपादक सचिन पांडुरंग चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कमलाकर जमदडे यांच्या या बहुमानाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, समाजाभिमुख, सत्यनिष्ठ आणि लोकहितवादी पत्रकारितेचा वारसा चालवणाऱ्या 'सिटी इंडिया न्यूज' परिवाराला ८ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात असून, हा प्रवास असाच यशस्वीपणे सुरू राहो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

