*वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ अकोलाचा पुढाकार; पातूर येथे रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वाटप*

*वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ अकोलाचा पुढाकार; पातूर येथे रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वाटप*

(पातूर, तालुका प्रतिनिधी : दूल्हे खान युसुफ खान)

शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने पातूर येथे रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वाटप करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांत सुमारे 600 वारकरी सहभागी झाले. रात्रीच्या वेळी पायी प्रवास करणारे वारकरी वाहनचालकांना सहज दिसावेत आणि अपघात टाळता यावेत, या उद्देशाने रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वितरण करण्यात आले.

यावेळी "रोड सेफ्टी व्हिजन" वाहनाद्वारे वारकरी व नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित पायी प्रवास आणि अपघात प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी गालींदे, मनोज शेळके, वाहनचालक गजानन सुलताने व गौतम अराखराव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत केले असून, रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी हा उपक्रम प्रभावी व उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Previous Post Next Post