दोन थेंब जीवनाचे; सांगवी बुद्रुक उपकेंद्रात पल्स पोलिओ अभियान उत्साहात संपन्न

दोन थेंब जीवनाचे; सांगवी बुद्रुक उपकेंद्रात पल्स पोलिओ अभियान उत्साहात संपन्न

यावल तालुका ग्रामीण प्रतिनिधी :-  *मुक्कदर तडवी*

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात रविवार, दि. 28 जून रोजी पल्स पोलिओ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाला कायमस्वरूपी पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या विशेष अभियानांतर्गत परिसरातील लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

अभियानाची सुरुवात डिंपल नितीन कोळी या बालकाला पोलिओचे “दोन थेंब जीवनाचे” पाजून करण्यात आली. यावेळी डॉ. पंकज पाटील, आरोग्य सेविका रेखा कोळी, आशा वर्कर कविता कोळी, संध्या कोळंबे तसेच इतर आशा सेविका उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.

ग्रामीण भागातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये आणि “पोलिओमुक्त भारत” हे राष्ट्रीय ध्येय पूर्ण व्हावे, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने अशा जनजागृतीपर मोहिमा राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या उपक्रमामुळे परिसरात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली असून पालकांनी आपल्या बालकांचे वेळेवर लसीकरण करून आरोग्यदायी भविष्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
Previous Post Next Post