रावेर शहरातील उटखेडा रोड गेला खड्ड्यात.वाहनधारकांसह नागरिकांचे हाल.खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा.. नगरपालिकाच्या आणि बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजणारा ठेकेदार काही मिळेना..

रावेर शहरातील उटखेडा रोड गेला खड्ड्यात.वाहनधारकांसह नागरिकांचे हाल.
खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा.. नगरपालिकाच्या 
आणि बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजणारा ठेकेदार काही मिळेना..

(जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी आरिप तडवी)

रावेर तालुक्यातील उटखेडा भाटखेडा रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे ह्या खड्ड्यांमुळे रहदारीसह वाहनधारकांना खुप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत असुन प्रवास करीत असतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे..या रस्त्याने प्रवास करीत असतांना अपघात होण्याची दाट शक्यता भासत आहे त्याचबरोबर महामंडळाच्या एसटी बसेस देखील कशातरी या रस्त्याने प्रवास करीत आहेत..भाड मे जाए जनता और अपना काम बनता अशी परिस्थिती नगरपालिका आणि बांधकाम खात्याची दिसत आहे कारण या रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी व नगरपालिका चे अधिकारी देखील प्रवास करीत असतात परंतु त्यांना ह्या रावेर शहरातील उटखेडा रोड वर च्या खड्ड्यांमुळे होणारा धोका कळत नाही का ?असा सवाल रावेर वासियांसह तालुक्यातील जनतेने उपस्थित केला आहे.तरी या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन रावेर शहरातील उटखेडा रोड च्या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ बुजुन काढावे आणि तालुक्याच्या जनतेसह वाहन धारकांचे होणारे हाल थांबवावे.. म्हणून परिसरातील जनतेने जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रस्त्याची दखल घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे
Previous Post Next Post