मतदार नोंदणी प्रकीयेत सक्रिय सहभाग घ्या, सामाजिक कार्यकर्ते -जावेद अहेमद
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड : जिल्ह्यातील व देगलूर तालुका, शहर व परिसरातील सर्व पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनःनिरीक्षण ( Special Intesive Revision - SIR) अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या,मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती केली असून देगलूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपले मतदार फॉर्म आपल्या गावातील बीएलओ शहरातील वार्ड बीएलओ यांना भरून द्यावे असे आवाहन देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद अहेमद यांनी केले आहे. नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह, तात्काळ बिओलोशी संपर्क साधून मतदार नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले,आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे देगलूर शहरातील व परिसरातील सर्व मतदारांनी वेळेत एस आय आर फॉर्म भरून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जावेद अहेमद यांनी केले आहे. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी या बाबीवर लक्ष देऊन,सर्व नागरिक व बीएलओ यांना सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे.

