अकोला शहरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक (Overload) करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली

अकोला शहरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक (Overload) करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली

(मुख्य जिल्हा प्रतिनिधी अकोला इमरान खान)

अकोला, दि. ६ जुलै 
अकोला शहरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक (Overload) करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली
 आहे. या मोहिमेत एकूण १३७ ऑटोवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ७० ऑटो जप्त करण्यात आले आहेत.शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर आज ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अनेक ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या १३७ ऑटो चालकांना जागेवरच दंड ठोठावण्यात आला. या मोहिमेदरम्यान एकूण ३९ हजार ९०० रुपयांचा महसूल दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे.कारवाई करण्यात आलेल्या वाहनांपैकी गंभीर उल्लंघन करणारे ७० ऑटो जप्त करून कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. केवळ दंडात्मक कारवाई न करता, वाहतूक पोलिसांनी सर्व ऑटो चालकांचे समुपदेशन (Counseling) केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी चालकांना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे
Previous Post Next Post