एसपींचा एक फोन आणि रावेर पोलीस अलर्ट; ट्रकचालकाचा खून करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद!
केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे थरारक कारवाई..
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका ट्रकचालकाचा गळा दाबून खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकता आग लावून फरार झालेल्या एका संशयितास रावेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. रावेर पोलिसांच्या या कामगिरीमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पैशाच्या वादातून उमेश गौरीशंकर मिश्रा (वय ५०) रा. जि. चंद्रपूर याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. संशयितांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला ट्रकसह पेटवून दिले होते. दरम्यान, दोन संशयितांनी तेथून पलायन केले होते. सदर संशयित पांढरी आयशर ट्रकसह जळगाव जिल्ह्याकडे गेल्याची केला. माहिती अमरावती पोलीस अधीक्षकांनी जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यात व विशेष करून रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना ही माहिती दिली. त्यानुसार आज सकाळी पावणे नऊ वाजता पाटील यांनी तीन पथक तयार करून वेगवेगळ्या दिशेने पाठवले.
केवळ एका अस्पष्ट फोटो
पोलिसांनी संशयिताचा एक अस्पष्ट फोटो व पांढरी आयशर ट्रकएवढेच माहिती पोलिसांकडे होती. पांढरी आयशर ट्रक पिंप्रीनांदू गावाकडून रावेरकडे येताना
दिसली. पोलिसांनी तिचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू संशयित मनप्रीतसिंग रंधावा यास त्यांच्या ताब्यात
आयशर ट्रककडून रावेर पोलीस स्टेशन हद्दीत आल्यावर असतांना मनप्रितसिंग कश्मिरसिंग रंधवा रा. महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर, पंजाब) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सखोत चौकशी करून सदर संशिताने गुन्हा कबूल केल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले, तर दुसरा संशयित हरदेवसिंग मनसिंग देवाल रा. राजूर, जि. चंद्रपूर हा अहमदाबादला (गुजरात) पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधून हरदेवसिंग याला ताब्यात घेतल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. आज दुपारी अमरावती ग्रामीण एलसीबीचे पथक रावेरला येऊन रावेर पोलिसांनी
देण्यात आले.
यांनी केली कारवाई
केवळ काही तासातच रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, उपनिरीक्षक मनोज महाजन, पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, सुनील वंजारी, पोलीस श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, तथागत सपकाळे, सुकेश तडवी, मनोज काटे, मुकेश सोनवणे, योगेश महाजन, चैतन्य नारखेडे, विकार शेख यांनी ही कारवाई केली.

