NEET - UG 2026 मध्ये समुद्रपूरच्या महिमा परमहंस चौधरी ची उत्सुंग भरारी...l
93.99 टक्के गुणांसह GMC मध्ये MBBS साठी प्रवेश निश्चित...
(मीडीया पोलीस टाईम
राजु कांबळे
वर्धा,अमरावती,नागपूर विभागीय संपादक )
समुद्रपूर. : समुद्रपूर तालुक्यातील गिरड (साखर बाहुली) नगरीतील महिमा परमहंस चौधरी हिने नीट - UG 2026 परीक्षेत उल्लेखनीय संपादन करीत 720 पैकी 479 गुण (93.99 टक्के) मिळविले आहे. महिमा ने जीवशास्त्र विषयात 97.86 टक्के, रसायनशास्त्र विषयात 94.07% आणि भौतिक शास्त्र विषयात 89.91% गुण घेत, विकास विद्यालय गिरड ची विद्यार्थिनी हिने कठोर परिश्रम आणि सातत्यापूर्ण अभ्यासाच्या बळावर आणि माहीमाने जिद्दीने, अत्यंत प्रतिकूल व आर्थिक दृष्ट्या मर्यादित परिस्थितीतही यशस्वी गडावर आरूढ झाली.
तिच्या या यशामुळे गिरड गावासह संपूर्ण समुद्रपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महिमाची हलाकीची परिस्थिती असूनही सोबतीला घरचे वातावरण शैक्षणिक असल्याने तसेच आताच LLB चे शिक्षण पूर्ण करून तिचा भाऊ सुमित चौधरी वकील पेशात येत असताना सुमित भाऊच्या हिमतीने तिचे स्वप्न पूर्ण झाले. आणि आई-वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची आता मेहनत हे महत्वाचे घटक ठरले.
NEET परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातही उल्लेखनीय गुण मिळवून अखिल भारतीय क्रमवारीत समाधानकारक स्थान प्राप्त केले. तिच्या यशाबद्दल गावातील सुजाण नागरिक, शिक्षक, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजातील गरजू रुग्णाची सेवा करण्याचा महिमाचा संकल्प असून तिच्या उज्वल भविष्यासाठी सर्व स्तरावरून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे तिचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. कारण डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले मूल्य..." शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केल्यास........" कोणतेही ध्येय शिखर करता येते. याचे हे उत्तम उदाहरण गिरड नगरीतील पहिली मुलगी MBBS ला प्रवेश निश्चित करणारी एकमेव महिमा चौधरी ने घालून दिले आहे.

