राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा ऊपाध्यक्षपदी दिक्ष परनंदी यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा ऊपाध्यक्षपदी दिक्ष परनंदी यांची नियुक्ती. 

( महेश निरसटकर 
 तालुका प्रतिनिधी भद्रावती)

भद्रावती दि. 10:- राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरद पवार गटाच्या चंद्रपूर(ग्रामीण)जिल्हा ऊपाध्यक्षपदी चंद्रपूर येथील दिक्ष दुर्गेश परनंदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे  यांच्या मान्यतेनुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्यातर्फे सदर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधीक मजबूत करण्याचे आवाहण या नियुक्ती पत्रातून करण्यात आले आहे.परनंदी यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन जिल्ह्यात अधीक मजबूत होईल असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांनी यावेळी व्यक्त केला.नियुक्ती झाल्याबद्दल परनंदी यांचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, नगरसेवक फय्याज शेख, बिपीन देवगडे,सिध्दार्थ दुर्गम,सामील खान,श्रीकांत सकाल,रोहीत येरुगुरला,शिवम चौहान, अविनाश मडगुलवार,निलेश भारती,आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Post Next Post