प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

(माहेमूद पिंजारी 
तालुका प्रतिनिधी देगलूर)

 देगलूर :जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या अवैध वाहतूकां विरोधात मरखेल पोलिसांची मोठी कारवाई करत २२ लाख ६० हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी माधवराव हुर्डेकर यांना ६ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, महिंद्रा थार (क्र.एम.एच.-३८-एके-००८८ ) या वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पानमसाला विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष हणेगाव तुंबरपल्ली मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ११.३० वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आले. कारवाई दरम्यान विविध ब्रॅण्डचा प्रतिबंधित गुटखा, महिंद्रा थार वाहन आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २२ लाख ६० हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अक्षय गुरूदत्त इंदोरीया ( वय ३३ रा. कपडा गल्ली हिंगोली) आणि दिपक लक्ष्मण शर्मा (वय २७ रा. मंगळवारा हिंगोली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post