अकस्मात मृत्यु' चा बनाव करून खुन करणा-या आरोपीस वेगवान, जलद व अचुक तपास करून अवघ्या ०३ तासात मुख्य आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांनी ताब्यात घेवुन खुनाच्या गुन्ह्याचा केला उलगडा.

अकस्मात मृत्यु' चा बनाव करून खुन करणा-या आरोपीस वेगवान, जलद व अचुक तपास करून अवघ्या ०३ तासात मुख्य आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांनी ताब्यात घेवुन खुनाच्या गुन्ह्याचा केला उलगडा.

( मुख्य अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान )

दिनांक ०८/०७/२०२६ रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतील रेल्वे गेट येथे एक अनोळखी पुरुष यास जख्मी अवस्थेत ईलाजाकामी सरकारी दवाखाना अकोला येथे भरती करण्यात आले होते, परंतु वैद्यकिय अधिकारी यांनी सदरील ईसम मृत पावल्यावे सांगितले. त्यावरून पोलीस स्टेशन डाबकीरोड येथे मर्ग क. ३७/२०२६ कलम १९४ भा. ना.सु.सं. दाखल करण्यात आला होता.

> सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर मर्ग दाखल होताच रात्रीचे दरम्यान मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना सदरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती काढणेबाबत आदेशित करण्यात आले होते.

> त्यावरून पो.नि. नितीन लेव्हरकर यांनी सरकारी दवाखाना येथे भेट देवुन मृतकाची पाहणी केली असता मृतकाचे अंगावर ठिकठिकाणी जख्माचे निशाण दिसुन आल्याने हा अपघात नसुन घात पात असल्याचे समजल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे ०२ पथक तयार करून सदर पथकास संपुर्ण घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदरील संशयास्पद अकस्मात मृत्यु प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले.

> सदर पथकाने मृतक यास उपचाराकामी दवाखान्यामध्ये घेवुन येणा-या व्यक्तीबाबत माहिती घेतली असता सदरील ईसम हा परिसरात मिळून आला नाही. त्यामुळे सदरील व्यक्तीवा तांत्रीक दृष्ट्या व गोपनिय बातमी दारा मार्फत शोध घेतला असता सदरील संशयीत व्यक्ती हा सुरेश रतनलाल अग्रवाल रा. मोहरी देवी, खंडेलवाल शाळेच्या मागे, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला असल्याने त्यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने प्राथमीकदृष्ट्या असे सांगीतले की, यातील मृतक राजु पांडुरंग इंगळे वय ४२ वर्ष, रा. फडके नगर, शिवराणा चौक, डाबकी रोड अकोला यास पैश्याच्या व जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण केल्याचे व सदरील मारहाणी मध्ये राजु इंगळे हा मृत्यु पावल्याचे सांगितले.

> LCB पथकांने केली गुन्हयाची उकल सदरील प्रकरण हे अकस्मात मृत्यु नसुन खुन असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक विश्लेषणावरून तसेच गोपनीय माहितीवरून आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे सुरेश रतनलाल अग्रवाल रा. मोहरी देवी, खंडेलवाल शाळेच्या मागे, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला यास अत्यंत शिताफीने ०३ तासात ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कारवाई कामी पो.स्टे. डाबकीरोड यांचे ताब्यात देण्यात आले. पो.स्टे. डाबकीरोड येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यावी प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी सा, यांचे मार्गदर्शनाखाली रथानीक गुन्हे शाखा येथील पो.नि नितीन लेव्हरकर, सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड, भिमराव दिपके यांनी केली आहे.
Previous Post Next Post