बिलोली तालुक्यातील खाजगी इंग्रजी शाळांमध्ये होणाऱ्या आर्थिक लुटीची चौकशी करून कारवाई करा.
रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष- गंगाधर इबितकर
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड : बिलोली तालुक्यातील खाजगी इंग्रजी शाळांमध्ये गणवेश व पुस्तकाच्या माध्यमातून, होणाऱ्या आर्थिक लुटीची चौकशी करून कारवाई करा अशी पंचायत समिती गट शिक्षण आधिकारी बिलोली यांना रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष गंगाधर इबितकर यांनी निवेदन दिले,असून जर शासनाने चौकशी नाही केली तर लोकशाही मार्गांनी मोठे जण आंदोलन उभा करणार असल्याचे,निवेदनात म्हटले आहे बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा, चालू असून तिथे इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली नागरिकांची अनेक प्रकारे आर्थिक लूट होत आहे सदर,शाळेमध्ये लागणारे गणवेश हे त्यांच्या वैयक्तिक मर्जीने, बाजारामध्ये सहज उपलब्ध न होणारे कलर निवडले असून,सदर गणवेश घेण्यासाठी एका विशिष्ट दुकानदारांना,कमिशनवर दिली आहे यामध्ये,सदर दुकानदारांनी गणवेशासाठी मर्जीची किंमत पैसे वसूल करीत आहेत, त्यामुळे पालकांना नाहक त्रास होत आहे, यामध्ये बिलोली शहरातील लिटल प्लवर कॉन्वेट स्कूल बिलोली,व सनशाइन इंटरनॅशनल स्कूल कार्ला खुर्द येथे शाळेने,बोधन येथील एका कापड दुकानदारांना सदर गणवेशेचा गुत्ता देऊन त्यांच्यामार्फत, पालकांची मोठी आर्थिक लूट करीत आहेत सदर शाळेने दुकानदारांना आपल्या शाळेत बोलावून गणवेश घेण्याची शक्ती करत आहेत सदर,दुकानदार हे शाळेमध्ये दोन दिवसच येणार असल्याची माहिती पालकांना देऊन गणवेश घेण्यासाठी करीत आहेत,व गणवेश नाही घेतल्यास तुम्हाला बोधन येथे जाऊन सदर गणवेश घ्यावे लागेल असे सांगत आहेत सदर गणवेश हे बिलोली सारख्या शहरांमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे पालकांमध्ये संभारंभ निर्माण होत आहे व त्यांना गणवेश भेटणार नसल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या किमतीमध्ये गणवेश खरेदी करावे लागत आहे,तसाच प्रकारे पाठ्यपुस्तकांमध्ये होत आहे यामुळे शाळेच्या गणवेशाबाबत तात्काळ कारवाई करावी बिलोली शहरात शहरा लगेच कापड दुकानदारांना व्यापराशी मिळणारे सहज उपलब्ध होणारे शालेय, पाठ्यपुस्तके निवडावे जेणेकरून पालकांची गैरसमय होणार नाही आणि आर्थिक लूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निवेदन पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आली आहे इंग्रजी खाजगी शाळेची चौकशी करून,लवकरात लवकर कारवाई नाही केली तर लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन उभा करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे,या निवदनामध्ये रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर इबितकर, अलीम शेख, मारुती कुडकेकर, मोहन मुंडकर, असे सामाजिक कार्यकर्त्यांची सह्या आहेत.

