श्री रेणुका देवी संस्थानातील सेवानिवृत्त आचारी यांना भावपूर्ण निरोप

श्री रेणुका देवी संस्थानातील सेवानिवृत्त आचारी यांना भावपूर्ण निरोप

(माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफीक गाईड्स)

माहूर : श्री रेणुका देवी संस्थान येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या श्री संतोष जाधव  आचारी यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत होते. यावेळी लेखापाल योगेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात नितीन गेडाम व अरुण घोडेकर यांनी केली.

उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त आचारी यांच्या संस्थेप्रती असलेल्या समर्पित सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थानच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी विश्वस्त चंद्रकांत भोपी
 विश्वस्त दुर्गादास भोपी अरविंद देव सुरक्षा अधिकारी मुंडे सर  तसेच व्यवस्थापक विजय राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. या निरोप समारंभाला संस्थानच्या सर्व विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम आनंदी व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
प्रतिनिधी. शेख रफिक गाईड  माहूर
Previous Post Next Post