रक्तदान, समाजसेवा अन् युवकांना नवी दिशा...संतोष पाटील साखरे 'दै. मराठीबाणा युवागौरव' पुरस्काराचे मानकरी

रक्तदान, समाजसेवा अन् युवकांना नवी दिशा

संतोष पाटील साखरे 'दै. मराठीबाणा युवागौरव' पुरस्काराचे मानकरी

(धर्माबाद नांदेड तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)

समाजसेवा, रक्तदान जनजागृती आणि युवकांमध्ये शिक्षणासह निर्व्यसनाचा संदेश सातत्याने पोहोचविणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील साखरे यांची 'दै. मराठीबाणा युवागौरव' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, दि. ५ जुलै रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे आयोजित भव्य

पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून कार्य करणारे संतोष पाटील साखरे यांनी रक्तदान चळवळीला बळकटी देण्यासाठी अनेक रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणीवेतून त्यांनी सातत्याने जनजागृती केली असून, स्वतःही तब्बल 12

वेळा रक्तदान करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

रक्तदानासोबतच युवकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि निर्व्यसनाचे मूल्य रुजविण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करतात. व्यसनमुक्त, सुशिक्षित आणि जबाबदार युवा पिढी घडावी, या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमांतून ते युवकांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या सकारात्मक विचारांचा आणि समाजाभिमुख कार्याचा

अनेक तरुणांवर प्रभाव पडत आहे. 'दै. मराठीबाणा युवागौरव' हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि युवकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या कार्याची पावती मानला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्यांचे समाजोपयोगी कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Previous Post Next Post