खतगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखाधिकारी रजेवर.पीककर्जासह विविध कामांना ब्रेक.

खतगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखाधिकारी रजेवर.

पीककर्जासह विविध कामांना ब्रेक.

( माहेमूद पिंजारी
 तालुका प्रतिनिधी देगलूर)

 देगलूर : बिलोली तालुक्यातील खतगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत कायमस्वरूपी शाखाधिकारी व कॅशियर उपलब्ध नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज मंजुरीची प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत असून विविध आर्थिक कामांनाही ब्रेक लागला आहे. खतगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत परिसरातील सुमारे २० ते २५ गावांतील शेतकरी व नागरिकांचे आर्थिक व्यवहार होतात. येथील तत्कालीन शाखाधिकारी सागर माहुलकर यांची ६ जून रोजी प्रशासकीय बदली झाली. त्यांच्या जागी महिला शाखाधिकारी एन. सी. खोबरागडे यांनी ८ जून रोजी पदभार पीककर्जासह विविध कामांना ब्रेक  २० ते २५ गावांतील शेतकरी व नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी स्वीकारला. मात्र, त्यांनी ८ व ९ जून असे केवळ दोन दिवसच कामकाज पाहिले आणि १० जूनपासून दीर्घ रजेवर गेल्या. त्यामुळे शाखेचे नियमित कामकाज विस्कळीत झाले आहे. याशिवाय शाखेतील महिला कॅशियरही प्रसूती रजेवर असल्याने बँकेत कर्मचारीवर्गाची कमतरता निर्माण झाली आहे. सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून
'गत एक महिन्यापासून बँकेत कायमस्वरूपी शाखाधिकारी व कॅशियर नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची आर्थिक कामे खोळंबली आहेत. तात्पुरत्या व्यवस्थेवर बँक चालविण्याऐवजी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करून नागरिकांची हेळसांड थांबवावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने बँकेला कुलूप ठोकण्यात येईल. बाळासाहेब पाटील
खतगावकर तात्पुरत्या स्वरूपात एक कॅशियर व बँक कर्मचारी अमोल मिरे यांच्यावर संपूर्ण शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली
आहे. मात्र, मर्यादितमनुष्यबळामुळे सर्व ग्राहकांची कामे वेळेत होत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. विशेषतः नवीन पीककर्ज प्रकरणे, कर्ज नूतनीकरण, शासकीय योजनांशी संबंधित आर्थिक व्यवहार, खातेविषयक कामे आणि इतर बँकिंग सेवा रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू असताना पीककर्ज वेळेत न मिळाल्यास शेतीच्या कामांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खतगावसह परिसरातील नागरिकांनी बँकेत कायमस्वरूपी शाखाधिकारी व कॅशियर यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. ही मागणी तत्काळ पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Previous Post Next Post