प्रदेश अध्यक्ष आ.रवींद्रजी चव्हाण यांची आ. जितेश अंतापूरकर यांनी घेतली भेट.
सदिच्छा भेटीत अभिनंदन व शुभेच्छा देगलूर-बिलोलीतील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर.
(माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर)
देगलूर : भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची एक वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर यांनी त्यांची प्रदेशकार्यालयात सदिच्छा भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पक्षसंघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या कार्याचा गौरव करत आ. अंतापूरकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. संजय कुटे आणि आ. माधवीताई नाईक उपस्थित होते. यावेळी आ. जितेश अंतापूरकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा
मतदारसंघात पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पक्षाचे विविध संघटनात्मक उपक्रमांचा, बूथस्तरावरील पक्षबांधणीचा तसेच पक्षविस्तारासाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे सादर केला. मतदारसंघातील संघटनात्मक बळकटीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यासोबतच मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रकीयेच्या (SIR) अनुषंगाने पक्षकार्याचे मतदारसंघात सुरू असलेल्या बूथनिहाय कामकाजाची माहिती आ. अंतापूरकर यांनी प्रदेशाध्यक्षांना दिली.मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा माहीती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात प्रत्येक बूथ अधिक सक्षमकरण्याबरोबरच पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कार्यकत्यांनी अधिक जोमाने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. संजय कुटे आणि आ. माधवीताई नाईक उपस्थित होते.

