)शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हा किसान काँग्रेस आक्रमक; पातुर तहसीलदारांना धडक निवेदन!
पातुर ९ जुलै
पातुर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या
अकोला जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटातून जात असून, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोला जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने पातुरचे माननीय तहसीलदार साहेब यांना एक धडक निवेदन सादर करण्यात आले. किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल पाटील अमानकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, शासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र लोकशाही मार्गाने जनजागृती मोहीम आणि आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदनामध्ये
अटी-शर्तींविना संपूर्ण कर्जमुक्ती करा आणि सातबारा कोरा करा!
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही अटी-शर्ती न लावता संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचा सातबारा तातडीने कोरा करण्यात यावा. तसेच
पीक विम्यात बदल करून ₹१७,५०० ची आर्थिक मदत तातडीने द्या!
पीक विमा योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नियमांमध्ये तातडीने बदल करण्यात यावा. पूर्वीप्रमाणे 'एक रुपयात पीक विमा' योजना लागू करून प्रत्येक विमाधारक शेतकऱ्याला ₹१७,५०० ची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी.
दुबार पेरणीसाठी प्रति एकर तातडीची आर्थिक मदत द्या!
पातुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर तातडीने आर्थिक मदत देऊन दुबार पेरणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
स्मार्ट वीज मीटरची सक्ती तात्काळ रद्द करा!
गावांमध्ये बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट वीज मीटरमुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. बिल भरण्यास विलंब झाल्यास वीजपुरवठा स्वयंचलितपणे खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च आणि वीज बिल कसे भरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती त्वरित थांबवून या धोरणाचा फेरविचार करावा.
"मागील हंगामातील पिकांचे अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जर शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही केली नाही, तर अकोला जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने जनजागृती मोहीम आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील," असा कडक इशारा यावेळी १)अतुल पाटील अमानकर
कार्याधक्ष अकोला जिल्हा किसान काँग्रेस,
२)राजेश गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष किसान काँग्रेस
३) मो.वहिद मो.शबिर,संघटक पातुर तालुका काँग्रेस.
अशोकराव अमानकर, माजी जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस.
मो.शब्बिर भाई, जिल्हा सरचिटणीस अकोला
मा. आमदार साजिद खान पठान.
मा. प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस.
मा. हिदायत खान, नगराध्यक्ष पातुर.
मा. जम्मू देठ,नगराध्यक्ष बाळापुर .
कोथळकर साहेब माजी नगराध्यक्ष.
दैलतराव घुगे, माजी बाजार समिती सभापती.
बब्बुभाई, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी
शामसिंग चव्हान,राजेश भाकरे, मनोहर पाचपोर,नागेश साबे,हरिभाऊ चोपडे,मनोहर वगरे शमिन पठान, सुधाकर गव्हाळे,गणेश शेंडे,
मुक्तार भाई, पातुर शहर अध्यक्ष
अझहर भाई, मधुकर दुतोंडे,ईश्वर जाधव,शाम घेघाटे,पाडुरंग भगत,मंगेश भगत,रामेश्वर भाकरे,
सुमन सोनोने,
अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

