पारधी वेड्यावरील अनेक कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात हिवरा पारधी बेड्यावर अनेक कुटुंब घरकुला पासून वंचित असून हिवरा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे सर्रास दुर्लक्ष असून बऱ्याच वर्षांपासून ते लोक घरकुल लाभापासून वंचित असून यांना अनेक समस्या पासून सामना करावा लागत आहे लहान लहान मुले घेऊन त्या तूटक्या फुटक्या घरात राहत असून प्रशासनाचे पारधी वस्ती कडे सर्रास दुर्लक्ष आहे करिता संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष घालून या वंचित परिवारांना लाभ मिळवून देण्यात यावे अशी मागणी पारधी बेड्यावरील रहिवासी यांनी केली आहे.

