अयोध्या राममंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी शिवसेनेचे हिंगणघाट येथे 'रामरक्षा आंदोलन'
(मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथील हनुमान मंदिर परिसरात दिनांक १३ जुलै रोजी 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा. अशोकभाऊ शिंदे आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी केले. यावेळी रामभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, प्रमोद भटे, तालुकाप्रमुख मनीष देवढे, विलास वैद्य, जिल्हा संघटक प्रमोद भोमले, शहरप्रमुख सचिन पोटदुखे, गजानन काटवले यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या नीताताई धोबे, सारिका अनासने, जयश्री देवढे, करुणाताई वाटकर तसेच इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. रामभक्तांच्या श्रद्धास्थानाशी संबंधित अशा प्रकारच्या घटना अत्यंत निषेधार्ह असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

