कुंडलवाडी पोलिसांची अवैध दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई, ६० हारांचा मुद्देमाल जप्त.
माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर : कुंडलवाडी येथील पोलिसांनी अवैध दारूविकी व तस्करीविरोधात शहर आणि परिसरात दि.८ जुलै रोजी दोन ठिकाणी धाड टाकून एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपोंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिदि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने दुपारी सुमारे ३.३० वाजता कुंडलवाडी वसस्थानकझधमावीद रोडवर छापा टाकला. यावेळी गणपत सायन्ना जक्कुचार (वय ४१, रा. खिडकी वेस, कुंडलवाडी) हा अवैध देशी दारूची तस्करी करताना आढळून आला. त्याच्याकडून देशी दारू भिंगरी संत्राच्या ९६ बाटल्या (किंमत ७ हजार ६८० रुपये) तसेच एमएच-२६ बीटी-१२३९ क्रमांकाची निळ्या रंगाची हीरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (किंमत ५० हजार रुपये) असा एकूण ५७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पांडुरंग शिदि यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष संगवार करीत आहेत. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता कुंडलवाडी बसस्थानकासमोरील दुर्गा हटिलवर दुसरी धाड टाकण्यात आली. या कारवाईत १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या २९ बाटल्या, अंदाजे २ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजेश गंगोणे (रा. कुंडलवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही कारवाया सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिदि यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष संगवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल बबीता पाटील, पोलिस कॉन्स्टेबल व्यंकट घोंगडे, आनंद बोडके, अजय बोलमवार, कल्याणकर, साईनाथ पुजारवाड आदींचा सहभाग होता..

