*महावितरणला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम, स्मार्ट मिटरची सक्ती रद्द न केल्यास नागरिकांचा आक्रमक मोर्चा ..*
(मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
आज दिनांक.8/7/2026 ला
*स्मार्ट मीटरचे बॉक्स फोडून स्मार्ट मिटर सक्तीचा नागरिकांनी केला निषेध.*
*राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात नागरिकांचे महावितरनाला निवेदन*
*हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेवर लादण्यात आलेली स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्याकरिता नागरिकांचा एल्गार...*
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच वीज ग्राहकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता महावितरण हिंगणघाट निवेदन देण्यात आले. वाढत्या वीजदरांमुळे, अनियमित बिलिंगमुळे आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, जनतेच्या हितासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

