नगराध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या पुढाकारातून दुसऱ्या टप्प्यात ९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी.

नगराध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या पुढाकारातून दुसऱ्या टप्प्यात ९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी.

( माहेमूद पिंजारी
 तालुका प्रतिनिधी देगलूर )

देगलूर: कुंडलवाडी  नगराध्यक्षा
सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या पुढाकारातून दि.७ जुलै रोजी ओएल.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद (भोसले गोपाळराव पाटील आय सेंटर, मुधोळ), मुक्तांगण सेवाभावी संस्था, धर्माबाद आणि कै. के. रामलू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रकिया उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आज ९ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना मुधोळ येथील भोसले गोपाळराव पाटील आय सेंटरमध्ये नेऊन नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सना व डॉ. भाविका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक पद्धतीने मोफत शस्त्रक्रिया करून कृत्रिम लेन्स बसविण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. यापूर्वी या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १३ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ रुग्णांना या मोफत उपक्रमाचा लाभमिळाला आहे. उर्वरित पात्र रुग्णांवरही लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती कै. के. रामलू प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन कोटलावार यांनी दिली. ३० जून रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात २६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ८२ रुग्णांमध्ये मोतीबिंदू, तर ४४ रुग्णांमध्ये नेत्र मांसवृद्धी (Pterygium) असल्याचे निदान झाले होते. पात्र रुग्णांवर टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. या सामाजिक आरोग्य उपक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार, उपनगराध्यक्षा सौ. नेहाताई शैलेश कावार, नगराध्यक्ष प्रतिनिधी गजानन कोटलावार, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शैलेश ऱ्याकावार, मुक्तांगण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. गोविंद चौधरी, भाजपा मंडळ अध्यक्ष बंटी ठक्करवार, भाजपा पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे विशेष सहकार्य लाभत आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
Previous Post Next Post