*गुटखा माफियाविरुद्ध अकोला पोलिसांचा दणका! खदान पोलिसांकडून ४० वर्षीय आरोपी मुसक्या आवळल्या*

*गुटखा माफियाविरुद्ध अकोला पोलिसांचा दणका! खदान पोलिसांकडून ४० वर्षीय आरोपी मुसक्या आवळल्या*

( मुख्य जिला प्रतिनिधिअकोला  इमरान खान )

  अकोला, दि. ६ जुलै:अकोला येथील खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांनी तब्बल २ लाख ३३ हजार ४९० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा (मुद्देमाल) जप्त केला आहे.खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सिंधी कॅम्प परिसरातील एका घरात एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करत आहे. या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दादाहरी वनवे, खदान डी.बी. पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अकोला येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन शासकीय पंचांसमक्ष प्रेमप्रकाश आश्रम जवळ, कच्ची खोली, सिंधी कॅम्प येथील संशयित घरावर छापा (रेड) टाकला.आरोपी अटक, लाखोंचा गुटखा जप्तया छाप्यात आरोपी गुलशन मनोहरलाल दुलानी (वय ४० वर्ष, रा. सिंधी कॅम्प, अकोला) याच्या घरातून २,३३,४९०/- रुपये विक्री किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यांनी केली कामगिरीसदर धडक कामगिरी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदानचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पीएसआई दादाहरी वनवे, पोलीस कर्मचारी गिरीश विर, संदीप काटकर, राजेश वानखडे, स्वप्नील वानखडे, निलेश बदे, विक्रांत अंभोरे, महिला पोलीस कर्मचारी आस्मा अयुब अली तसेच एलसीबीचे पीएसआय अनिल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
Previous Post Next Post