११ ला भंडारा येथे खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा जाहीर सत्कार
महायुतीच्या पुढाकाराने सत्कार सोहळ्याचे आयोजन
(विलास केजरकर भंडारा.)
भंडारा:- भंडारा व गोंदिया जिल्हा महायुतीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा सदस्य आणि भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून विजय मिळवून नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन आणि नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या सत्कार सोहळा शनिवार दि. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता लक्ष्मी सभागृह जे. एम. पटेल समोर भंडारा करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल राहतील. प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, भाजपा संघटक विरेंद्र (बाळा) अंजनकर, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल उपस्थित राहणार आहेत.
तरी या भव्य सत्कार सोहळ्यास महायुतीचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने, सौ. सीताताई रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, प्रेमकुमार रहांगडाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल गायधने व मुकेश शिवहरे तसेच महायुतीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

