लिटिल एंजल हायस्कूलचा जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश; पथनाट्य व चित्रकलेत प्रथम, घोषणालेखनात तृतीय

लिटिल एंजल हायस्कूलचा जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश; पथनाट्य व चित्रकलेत प्रथम, घोषणालेखनात तृतीय

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )

युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या 'माय भारत - वर्धा' तसेच 'नशा मुक्त भारत अभियान २०२६' अंतर्गत आयोजित "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत" या जिल्हास्तरीय स्पर्धेत हिंगणघाट येथील लिटिल एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा गुरुवारी (दि. ३० जुलै) बजाज सायन्स कॉलेज, वर्धा येथे पार पडली.

स्पर्धेतील नुक्कड नाटक (पथनाट्य) गट प्रकारात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी पथकात मयंक माकडे, इशांत अंबडकर, यश हिवरकर, अर्पित माकडे, तेजस खेकरे, अथर्व नागराळे, यश गोधाम, सात्विक मून आणि हर्षिता देशमुख यांचा समावेश होता.

चित्रकला स्पर्धेत इयत्ता दहावीची विद्यार्थिनी नव्या बुराड हिने प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच घोषणालेखन (स्लोगन) स्पर्धेत इयत्ता नववीचा विद्यार्थी कान्हा बोरकर याने तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयंत भोयर, संचालिका सौ. करुणा भोयर, मुख्याध्यापक श्री. अजय फुलझेले, क्रीडा विभागप्रमुख श्री. निशांत येखंडे, मुस्तफा बख्श तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

लिटिल एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत अभियानाचा प्रभावी संदेश देतानाच आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवून हिंगणघाटच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post