दहा वर्षांच्या नरकयातनेतून कागजीपुरावासीयांची सुटका; माजी नगरसेवक नकीर खान यांच्या प्रयत्नांना यश, सिमेंट रस्त्याचे काम सुरू*

*दहा वर्षांच्या नरकयातनेतून कागजीपुरावासीयांची सुटका; माजी नगरसेवक नकीर खान यांच्या प्रयत्नांना यश, सिमेंट रस्त्याचे काम सुरू*

( अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान)

अकोला:प्रभाग क्रमांक ११ मधील अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कागजीपुरा परिसरातील नागरिकांना गेल्या १० वर्षांपासून सहन कराव्या लागणाऱ्या नरकयातनेतून अखेर सुटका मिळाली आहे. या परिसरातील मुख्य रस्त्यावर रोज फुटणाऱ्या नाल्यांचे पाणी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले होते. मात्र, माजी नगरसेवक नकीर खान अहमद खान यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या निधीतून या रस्त्याचा प्रश्न सुटला असून, प्रत्यक्ष सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.श्रद्धालू आणि नागरिकांचे हाल संपणारकागजीपुरा भागात अकोला शहरातील सर्वात प्रसिद्ध मशीद आहे. जेथे दररोज पाचही वेळची नमाज अदा करण्यासाठी शेकडो नागरिक येतात. मात्र, रस्त्यावर साचलेल्या नाल्याच्या घाण पाण्यातून आणि दगडांचा आधार घेत नमाज पठणासाठी जावे लागत होते. याशिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी पडून जखमी होण्याच्या घटना रोजच्याच बनल्या होत्या. गेल्या १० वर्षांत या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप होता.आमदार निधीतून कामाला मंजुरीपरिसरातील नागरिकांनी आपली व्यथा माजी नगरसेवक नकीर खान अहमद खान यांच्याकडे मांडली. नकीर खान यांनी तात्काळ समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आमदार निधीतून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. प्रशासकीय मंजुरी मिळताच माजी नगरसेवक नकीर खान यांनी कागजीपुरा परिसरातील सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.नागरिकांकडून जाहीर आभारगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता अखेर सिमेंटचा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अनेक वर्षांची समस्या दूर केल्याबद्दल कागजीपुरा भागातील नागरिकांनी आणि मशिदीच्या कमिटीने माजी नगरसेवक नकीर खान आणि आमदार अमोल मिटकरी यांचे मनापासून आभार मानले आहेत
Previous Post Next Post