भद्रावती पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई;
विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, ₹३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती, दि. २९ : भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थां विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ५.११ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज पावडर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ₹३२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन पोउपनि संतोष नारायण केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. २७ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०० ते ११.२० वाजताच्या सुमारास पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान भद्रावती येथील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाची झडती घेतली असता त्याच्याकडे ५.११ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज पावडर (किंमत ₹१२,०००) आणि गुन्ह्यात वापरलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (किंमत ₹२०,०००) असा एकूण ₹३२,००० चा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १०७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, यांचे नेतृत्वात सपोनि विरेंद्र केदारे, सपोनि संजय मिश्रा, पोउपनि संतोष केदार, ग्रे पोउपनि गजानन तुपकर सफौ,महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आष्टुनकर,पोहवा गोपाल आतकूलवार पो.अं, खुशाल कावडे, पो.अं संतोष राठोड, पो.अं योगेश घाटोळे तसेच चालक पो. अं (बकल क्रमांक ६०२६) यांनी विशेष सहभाग घेतला.
भद्रावती पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

