दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गरुडझेप: अंधारमळी शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका!

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गरुडझेप: अंधारमळी शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका!

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितु इंगळे रावेर: )

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रावेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधारमळी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. कोणत्याही सुविधा नसताना केवळ जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरले आहे.या परीक्षेत फैजान फिरोज तडवी याने २३२ गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्यासोबतच आवेश आरिफ तडवी (२०२ गुण), साबिर मुस्तुफा तडवी (१९८ गुण), आलिया अरमान तडवी (१९६ गुण) आणि शहादत गुलशेर तडवी (१७६ गुण) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत यशोशिखर गाठले.दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेक शैक्षणिक अडचणी असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही इतिहास घडवू शकतात, हे या गुणवंतांनी सिद्ध केले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक शेखर तडवी यांचे कुशल नेतृत्व, मार्गदर्शक शिक्षिका मीना तडवी यांचे अथक परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुक होत असून, अंधारमळी गावाच्या शैक्षणिक वाटचालीत एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
Previous Post Next Post